जनतेज न्युज

ते दोघे ही पुण्यात सिव्हील इंजिनियर..कोरोना लाॅकडाऊन गावी आले..मात्र नोकरी लाथाडुन करु लागले पोल्ट्री व्यवसाय,६० दिवसांत मिळवला २ लाख ५२ हजारांचा नफा

प्रतिनिधी , पंढरपूर : पुण्यात सिव्हील इंजिनियरिंग ची नोकरी करीत असलेले भुषण व स्वप्ना शिरसट या दाम्पंत्यानी नोकरीचा मार्ग सोडुन केवड गावी शेतीपुरक पोल्ट्री चा व्यवसाय सुरु केला.त्यांनी कोंबड्याच्या पालनाचे त्यांच्या विक्रीचे योग्य नियोजन केल्याने सिरसट यांना हा व्यवसाय नफा देणारा ठरलाय.गेल्या पाच महिन्यांपासून ते हा व्यवसाय करताहेत.मागील ६० दिवसांत त्यांनी २ लाख ५४ हजारांचा निव्वळ नफा देखील मिळवला आहे.

सीना नदीच्या काठावरील केवड गावात त्यांनी हा व्यवसाय थाटला आहे.
विवाह गाठ बाधल्यानंतर ते पुण्यातील येरवडा भागात असलेल्या कंपनीत हे दोघेही सिव्हील इंजिनियर म्हणुन कार्यरत होते.दोघांना महिन्याकाठी एक लाख रुपयाची पगार घेत होते.कोरोना लाॅकडाऊन जाहीर होताच भुषण आणि स्वप्ना सिरसट हे पुण्यातील कंपनी मधुन केवड गावी आले.लाॅकडाऊन मुळे गावातच बसुन राहिलेल्या दांपत्याने आता कायमची नोकरी सोडुन शेतीपुरक पोल्ट्री व्यवसाय करण्याचं ठरवलं.त्यानुसार त्यांनी सुरुवातीला घराच्या परिसरातच २०० कोंबड्या पालनाला सुरुवात केली.त्यानंतर केवड च्या शिवारात वडिलोपार्जित एक एकर शेतीत ३२×६० चे पत्रा शेड उभारुन ३ हजार देशी कोंबड्या आणल्या.६५ दिवसांत एकुण ४ लाख ६५ हजार इतका खर्च त्यांना आला.खर्च जाता २ लाख ५४ हजारांचा नफा मिळाला आहे.भुषण याच्या व्यवसायात आई शाहूबाई,वडिल पाडुरंग याची ही साथ लाभत आहे.
आता पर्यत हाती आलेले यश पाहता याहून ही भव्य स्वरूपात व्यवसाय करण्याचा त्याचे नियोजन सुरु आहे.एकीकडे अनेक तरुण तरुणी नोकरीसाठी धडपडताहेत.दुरसरीकडे शेतीतील नुकसानीला अन् समस्येला कंटाळुन जिवन संपवताहेत.मात्र मेहनत,जिद्द आणि त्याला कल्पकतेची जोड दिल्यास शेतीच्या जोडधंद्यातून चांगल उत्पन्न तर मिळतंच शिवाय ही समाधान ही.फक्त पैश्यासाठी जाॅब करणार्‍या लग्नानंतर करियर संपल असा समज असणार्या तरणाईला शिरसट यांनी वेगळी वाट दाखवली असुन ही यशोगाथा आजच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरणारी अशीच आहे.

सध्या १० हजार कोंबड्याचे पालन-
सिरसट दाम्पत्याला कुक्कुटपालन व्यवसायातून मिळालेल्या यशानंतर आता च्या घडीला त्यांनी दहा हजार
देशी कोंबड्या चे पालन सुरु केले असुन त्यासाठी ३०×१५० शेड उभारले आहे.सिरसट दांपत्याची यशोगाथा ऐकल्यानंतर परिसरातील तरुणाई प्रकल्प पाहण्यासाठी आवर्जुन हजेरी लावत आहेत.