प्रतिनिधी , मुंबई : ज्या प्रमाणे मुंबई महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला आहे त्याप्रमाणे ठाणे महानगर पालिकेने देखील शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याची मागणी ठाणे मनसे ने केलीये. आनंद दिघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ठाणे शहराचं केंद्रबिंदू असलेल्या चिंतामणी चौक या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली तसेच भविष्यातील प्रत्येक पिढीला आनंद दिघे हे कोण होते आणि त्यांनी ठाण्यासाठी काय केलं हे कळलं पाहिजेल यासाठी मनसे ठाणे -पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे . पुतळे बांधावेत यासाठी आम्ही नाही आहोत पण खरच दिघे साहेबांचा पुतळा झाला पाहिजेल अशी मनसे ची मागणी आहे . मुळातच मागच्या २०वर्षात आनंद दिघे जाऊन २० वर्ष झाली या २०वर्षात अशी एक ही वास्तू ठाण्यात शिवसेनेची सत्ता असताना ठाण्यात कुठे उभी राहिलेली नाही जेणे दिघे साहेबांचे नाव प्रकाऱ्याने दिसेल . दिघे साहेबांचे नाव खूप मोठे आहे . ज्या दिघे साहेबानी याना सर्वाना उभ केलं अनेक जण अशी आहेत ती अपक्ष उभं राहिले होते त्याचं डिपॉजिट जप्त होतील पण आनंद दिघे साहेबानी जे ठाण्यात शिवसेना पेरली त्यातून जे काय हे लोक फळ खाताय त्यांना कमीत कमी एवढ तरी वाटलं पाहिजेल कि दिघे साहेबांच्या नावाने एखादी उत्तम वास्तू उभी राहिली पाहिजेल होती एखादी योजना काही तरी सुरु झाली पाहिजेल होती परंतु अशी कुठलीच गोष्ट मागच्या २० वर्षात सुरु झाली नाही करायचं होत तर घोडबंदर रोड आहे आज तेथे नवीन शहर उभं राहत आहे . त्या रस्त्याला दिघे साहेबांचं नाव देऊ शकला असता असे मनसे ठाणे – पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे बोलले . तसेच आनंद दिघे साहेबांचा एक पुतळा चिंतामणी चौकात
उभारावा .यासाठी अविनाश जाधव याना अनेक नगरसेवक निधी दयायला तयार आहे जर नगरसेवक निधीतून पुतळा होत नसेल आणि शिवसेनेला ते करायचं नसेल तर मनसे जस राम मंदिर ला पैसे गोळा केले तसे ठाण्यात दिघे साहेबांच्या पुतळ्यासाठी दिघे साहेबांच्या अनुयांकडून पैसे गोळा करू आणि दिघे साहेबांचा उत्तम सुदंर पुतळा तरुणांना मार्गदर्शन राहील असा पुतळा उभारू असे मनसे ठाणे -पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव बोलले .
