जनतेज न्युज

दिवाळीनिमित्त किट लाभार्थ्यांपर्यंत कधी पोहणार? – रेशन धारका

प्रतिनिधी, जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त रेशन धारकांना दिवाळी गोड करण्यासाठी किट वाटप करणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसापूर्वी केली मात्र महाराष्ट्रातील काही भागात रेशन धारकांपर्यंत किट पोहचल आहे तर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यातील लाभार्थी दिवाळीच्या किट ची वाट पाहत आहे चोपडा तालुक्यात 46 हजार 4 43 लाभार्थ्यांना या किटच्या वाटप करण्यात येणार आहे परंतु चोपडा तालुक्यात पुरवठा विभागाच्या गोडाऊनला काही साहित्य आले असले तरी चणाडाळ आणि ज्या पिशवीमध्ये त्या किट भरून वाटप करायचे आहे त्या पिशव्या अजून पर्यंत उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त शासनाची घोषणा प्रमाणे किट दिवाळीच्या आधी मिळेल का का दिवाळी झाल्यानंतर मिळेल असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे.

यासंदर्भात गोडाऊन मॅनेजरला विचारले असता त्यांनी सांगितले की तहसीलदार अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी देवेंद्र नेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः लाभार्थ्यांना किट वाटप करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे परंतु चणाडाळ आणि पिशवी उपलब्ध झालेल्या नसल्याकारणाने आज उद्या मध्ये उपलब्ध झाल्या की वाटप करणार असल्याचे गोडाऊन मॅनेजर नन्नवरे यांनी सांगितले. रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास देशमुख यांच्याशी याबद्दल विचारणा केले असता त्यांनी सांगितले की राज्य सरकारने जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेबद्दल लाभार्थी आम्हाला वारंवार विचारत आहे त्या संदर्भात प्रत्येकाला तोंड द्याव लागत आहे परंतु चणाडाळ आणि पिशवी उपलब्ध नसल्या कारणाने दिवाळीनिमित्त किट वाटपाला दिरंगाई होत असल्याचा सांगितले. या संदर्भात लाभार्थी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अजून पर्यंत शासनाने घोषित केलेल्या दिवाळीनिमित्त किट मिळालं नाही दिवाळी दोन दिवसावर आली असली तरी अजून पर्यंत किट मिळाले नाहीये दिवाळी झाल्यावर किट मिळेल का काय असावा लाभार्थी यांनी सांगितले.