प्रतिनिधी , नागपूर : दरवर्षी भीम अनुयायी 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जात असतात या वर्षी कोरोना प्रादुर्भाव काळ लक्षात घेता बीएसपीचे जिल्हा प्रभारी नागोराव जयकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की या वर्षी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे जेणेकरून कोरोना प्रादुर्भावाला आपण दूर सारू शकू. सोबतच बीएसपी तर्फे नागपुरात 6 डिसेंबरला दक्षिन पश्चिम मध्ये कार्यक्रम घेण्यात येणार आहे , सोशल डिस्टनसिंगचे पालन करून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती नागोराव जयकर यांनी केली..
