जनतेज न्युज

नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा चा खूप मोठा साठा जप्त केला आहे…

प्रतिनिधि , नागपूर पोलिसांच्या जोन 1 च्या पथकाने थेट यवतमाळच्या मारवाडी चौकात आज पहाटे धाड टाकून तब्बल 785 रील नायलॉन मांजा जप्त केला आहे..

काल नागपूरात एका इसमाकडे नायलॉन मांजाचा काही साठा आढळला होता.. त्याच्या चौकशीत नागपूरात नायलॉन मांजा यवतमाळ मधून येत असल्याचे कळले..

त्यानंतर लगेच एक पथक यवतमाळ ला रवाना करण्यात आले.. आणि मारवाडी चौकात एका गोदामात धाड टाकून घातक नायलॉन मांजा चे 785 रील जप्त केले आहे…

एवढ्या मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा बाजारात विक्रीला आला असता तर अनेक लोक जखमी होण्याची भीती होती…