40 बसेसचा ताफा रस्त्यावर उतरणार
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलिकरांचा जिव्हाळ्याचा व प्रतीक्षेत असलेला पत्रिपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या 20 व 21 तारखेला या पुलाचे गर्डर सरकवण्यात येणार आहेत .या कामासाठी रेल्वेकडून दोन दिवस चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे .या दरम्यान लोकल ने प्रवास करणाऱ्या चाकरमाण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमसीच्या परिवहन उपक्रमाने आपल्या 40 जादा बसेसची फौज रस्त्यावर उतरवली आहे .यामधील कल्याण ते डोंबिवलीसाठी 10 बस ,विठ्ठलवाडी ते डोंबिवली साठी 5 बस ,कल्याण ते बदलापूर साठी 5 बस ,कल्याण टिटवाळा साठी 5 बस अशा एकूण 40 बस रस्त्यावर साधारणतः 10 मिनटाच्या अंतरावर प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार आहेत .
