जनतेज न्युज

पहिलीच्या विद्यार्थ्यांना उंटावरून मिरवणूक काढत आणले शाळेत…

प्रतिनिधी, बुलडाणा : कोरोना महामारी च्या दोन वर्षाच्या संकटानंतर निर्भयपणे यावर्षीच्या नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्यात आली, ज्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, तर खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गावातून उंटावरून मिरवणूक काडत, त्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन शाळेत स्वागत करण्यात आले…
पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षणाविषयी असलेली भीती दूर व्हावी, आणि त्यांना शिक्षणाची ओढ लागावी, यासाठी शाळेच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला… या उपक्रमामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले… यावेळी गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, त्याचबरोबर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते…