प्रतिनिधी, नवी मुंबई : शिरवणे माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर सुतार यांनी आपल्या शिष्टमंडळासह नवीमुंबई महानगर पालिकेच्या नेरूळ प्रभाग ऑफिसला भेट देऊन सहाय्यक आयुक्त विनोद नगराळे यांची भेट घेतली,सुरवातीला आलेल्या शिष्ट मंडळाला पाहून निघून गेले त्यामुळे ज्ञानेश्वर सुतार आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी ऑफिस बाहेर ठिय्या मांडला,त्यानंतर याची दाखल घेत अधिकारी आले,यावेळी पाण्याच्या मुद्द्यावर सहाय्यक आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले कमी दाबाने पाणीपुरवठा आणि एकाच जागेवर 25 वर्ष ठाण मांडून बसलेले पाणी पुरवठा कर्मचारी याविषयी जाब विचारलं असता पालिका अधिकार्यांची बोलती बंद झाली.यावेळी शिष्टमंडळात उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर यांच्यासह अविनाश सुतार, विभाग प्रमुख जयवंत भोईर,उप विभाग प्रमुख विवेक सुतार,शाखा प्रमुख श्रीकांत भोईर,महिला आघाडीच्या सुजाता सुतार,प्रतिभा सुतार,वैशाली पाटील व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
