जनतेज न्युज

पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणा अण्णा लाड यांनी पलूस शहरात बजावला मतदानाचा हक्क बजावला

प्रतिनिधी , पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण अण्णा लाड यांनी सांगली जिल्ह्यातील पलूस या शहरात मतदानाचा हक्क बजावला. वांगी येथील येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मतदान केंद्रांमध्ये लाड यांनी आपलं मत नोंदवलं. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील असून त्यामुळे सांगली जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ हा आपल्या मालकीचा आहे असं ज्या पक्षांना वाटत होतं हे चित्र मतदारांनी यावेळी बदलला आहे सुशिक्षित आणि खेडोपाडी गावा गावातील शहरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदार नक्कीच मला विजयी करतील असा आशा आहे असा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणा अण्णा लाड यांनी केला आहे