जनतेज न्युज

पुण्यात शिवसैनिकांच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

प्रतिनिधी, पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंड आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे.पुण्यातही आज शिवसैनिकांच्यावतीने बंड नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.येरवडा येते एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळत आणि फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम शिवसैनिक सहभागी झाले होते.यावेळी या मुस्लिम शिवसैनिकांनी मंत्री अब्दुल सत्तार याच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही केली.अनाथांचा नाथ एकनाथ यांचा हिंदुत्व एकवेळा आम्हाला समजू शकतो पण अब्दुल सत्तार यांचा हिंदुत्वाशी काय संबंध ? राज्यातील मुस्लिम समाज हा काल ही शिवसेना बरोबर होता आजही आहे.आणि उद्याही राहणार असल्याचं यावेळी मुस्लिम शिवसैनिकांनी म्हटल आहे.