प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील बोरवेल असोसिएशन संघटनेच्यावतीने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाला धुळे जिल्ह्यातील सर्वच बोरवेल मालकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत बोरवेल चे काम पूर्णपणे बंद करीत कामबंद आंदोलन केले आहे.
संपूर्ण देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलची दरवाढ दिवसेंदिवस वाढत आहे. ही पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनेक लहान मोठ्या ट्रान्सपोर्ट, बोरवेल संघटना अजून पेट्रोल डिझेल वर अवलंबून असणाऱ्या लहान मोठे व्यावसायिकाना याचा फटका बसत आहे. बोरवेल ह्या व्यवसायावर उदरनिर्वाह करत असणाऱ्या मालक तसेच कामगार उपासमारीची वेळ आली आहे. डिझेल दरवाढ च्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्ह्यात बोरवेल असोसिएशनने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पूर्णपणे आपले बोरवेल करण्याचे काम बंद करून शासनाकडे मागणी केली आहे तसेच नागरिकांना आव्हान केले आहे की जोपर्यंत शासन डिझेलच्या दरवाढीचा कमी करत नाही तोपर्यंत सदर आंदोलने चालू राहील अशी माहिती बोरवेल संघटनेचे रज्जाक पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
