प्रतिनिधी, बुलडाणा : आज वैशाखी पौर्णिमा म्हणजेच संपूर्ण विश्वाला शांतिचा संदेश देणारे शांतिदुत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस,ज्ञानप्राप्ति व महापरिनिर्वाण दिन अशा तीनही महत्त्वपुर्ण ऐतिहासिक पवित्र घटनांचा पवित्र दिन म्हणजे बुद्ध पौर्णिमा जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त बुलडाणा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं सकाळीच धम्मगिरी बुद्धविहार येथील तथागत भगवान बुद्ध यांच्या मुर्ती चरणी दीप प्रज्वलित करून वंदन केले तसेच सहकार विद्या मंदिर येथे तथागत गौतम बुद्धां प्रतिमेला धूप दीप पुष्प अर्पण करुन भिखु संघाने अभिवादन केले. त्यानंतर भिखु संघाच्यावतीने उपस्थितांना त्रिशरण पंचशील देण्यात दिले. त्यानंतर भदन्त शिलरत्न यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली यावेळी बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
