जनतेज न्युज

भाजप आमदार राम कदम यांनी वेब सिरीज तांडव विरोधात तांडव सुरू केलं आहे.

प्रतिनिधि , मुंबई : आजचा तिसऱ्या दीवशी राम कदम यांनीही तांडव सिरीजच्या निर्माते,दिग्दर्शक,अभिनेते यांच्यावर घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली पण त्या तक्रारींवर अजूनही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही त्यांच्या FIR दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी आज एक दिवसाच लाक्षणिक उपोषण घाटकोपर पोलीस स्टेशन समोर सुरू केलं होतं दोन तासानंतर घाटकोपर पोलिसांनी हे उपोषण मोडीत काढून उपोषण स्थळाहुन आमदार राम कदम यांना आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं यावेळी राम कदम यांच्यासह पोलिसांच्या आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला.त्यानंतर अर्ध्या तासाने पोलिसांनी राम कदम यांनी सोडलं पण येत्या 48 तासात कारवाही केली नाहीं तर त्याविरोधात उग्र आंदोलन करू असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.महाराष्ट्र सरकार वेळ कडू धोरण अवलंबत आहे पोलिसांना कारवाही करू देत नाही असा आरोप राम कदम यांनी केला आहे.