प्रतिनिधी, नांदेड : कन्या कुमारी पासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे.कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली भारत जोडो यात्रा तेलंगणा मार्गे नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर येथे पोहचणार आहे. 7 ते 11 नोव्हेंबर असे पाच दिवस ही यात्रा नांदेड जिल्ह्य़ात राहणार आहे. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार 9 नोव्हेंबर रोजी नायगाव येथे यात्रेत सहभागी होणार आहेत शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे, सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक समविचारी पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर या यात्रेत सहभागी होणार आहेत अशी माहिती दिली. तर 10 नोव्हेंबर रोजी नांदेड च्या नवा मोंढा येथे जाहीर सभा होणार आहे. असे ही चव्हाण यांनी सांगितले.
