जनतेज न्युज

भारतीय वायू सेनेत पूजा शिंदेंची गगनभरारी… सातारा जिल्ह्यातील पहिली महिला कॅडेट सैन्य दलात आधिकारी होण्याचा मान…

प्रतिनिधी , सातारा : ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे तो यशाची शिखरे सहज गाठू शकतो..सातारा जिल्ह्यातील पूजा शिंदे हिने भारतीय वायुसेनेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे..सैन्य दलातील महिला अधिकारी पदावर निवड झालेली पूजा सातारची पहिली महिला कॅडेट ठरली आहे..

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील पूजा आनंदराव शिंदे हिची इंडियन एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसरपदी निवड झाली आहे. भारतीय वायुसेनेमार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सातारच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि 22 महाराष्ट्र बटालियनची ‘एनसीसी’ कॅडेट पूजा शिंदे हिने यश संपादन करून साताऱ्याचे नाव उंचावले आहे..
पुजाची फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे…भरती होण्यासाठी अवघड असे तीन टप्पे पार करून घेतलेल्या अथक परिश्रमातुन यश मिळाल्याची भावना पूजाने व्यक्त केली आहे..

सातारा जिल्ह्यात आपली मुलगी पहिली आली याचा मला अभिमान वाटला घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील पूजाला कष्टातून शिक्षण दिले… पूजाच्या आईला शिक्षणाची आवड असल्याने दोन्ही मुलींना उच्च शिक्षण देण्याचा ध्यास आईने ठेवला होता.. मुलांना नुसतं स्वप्न न दाखवता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहन आणि बळ देण्याचे काम आईने केलं;आतापर्यंतची अधिकारी ग्रामीण भागातील झाले आहे

शेतकरी कुटुंबातील पूजाने यश मिळवल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शेती व्यवसायातून आनंदराव शिंदे यांनी पूजाला फ्लाईंग ऑफिसर पदापर्यंत निवड होण्यासाठी कधीही शिक्षण कमी पडू दिले नाही..अपार कष्टातून हवी ती मदत पूजाला केली असल्याचे वडील सांगतायेत

पुजाचे कौतुक वाटते . लहानपणापासून अभ्यासाची आवड होते.आजोबांची हौस होती नातीने चांगले शिकावे.आजोबांना पण मुलींचा अभिमान होता. अजून पूजा आई-वडीलांचे नाव कमवणार

सातारा जिल्ह्यातील चिमणगावच्या पूजाने यश संपादन करुन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

21व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा देत महिलाही आज पुढं येताना दिसत आहेत. इंडियन एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर झालेल्या पूजाच्या यशाची गगनभरारी पाहून साताऱ्यातील इतर झाशीच्या राणींना प्रेरणादायी ठरणार यात काही शंका नाही..