प्रतिनिधी, ठाणे : मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने ताब्यात घेतल्या नंतर कालपासूनच संपूर्ण राज्यभरात मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ विविध आंदोलन केले जात आहेत. त्यातच आज ठाण्यात महाविकास आघाडी करून देखील मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे चे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तर महा विकास आघाडीचे हे आंदोलन असून शिवसेना पक्ष मात्र या आंदोलनाला अनुउपस्थित असल्याचे पाहायला मिळाले मंत्री नवाब मलिक यांना ईडी करून मुद्दामून त्रास दिला जात आहे तर भाजप सरकार या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याकडून आरोप करण्यात आला या आंदोलनाबद्दल शिवसेना पक्षाचे महापौर नरेश म्हस्के यांना सुद्धा कळवले असून ते या ठिकाणी न आल्याचे कारण त्यांनाच माहिती असे माजी खासदार आनंद परांजपे यांनी यावेळी सांगितले व केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपाची दलाली करत असल्याचे यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आरोप केले..
