प्रतिनिधी , पुणे : महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यावरून आज पुणे महापालिकेत चांगलाच गदारोळ झाला. आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. ती ऑफलाईन म्हणजेच सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यात यावी अशी काँग्रेस, राष्ट्रवादी सह विरोधी पक्षांची मागणी होती. असं असताना सत्ताधारी भाजपने ही सभा ऑनलाईन घेण्याचं ठरवलं. त्यावरून वाद निर्माण झाला आणि विरोधी पक्षाच्या सभासदांनी महापौर दालनात गोंधळ घातला. महापौर दालनात ठिय्या मांडत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी भाजपला काहीतरी लपवायचे आहे त्यामुळे ते प्रत्यक्ष सभा घेण्यास तयार नाहीत असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. तर विरोधक या विषयाचं राजकारण करत असल्याचा प्रत्यारोप सत्ताधाऱ्यांनी केलाय.
