प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळा नजीक असणाऱ्या धोकादायक वळण पुलावर एक मालवाहू ट्रक पलटी झाला यात दुचाकी दाबली गेल्याने मोटारसायकलचचा अक्षरशः चक्कचुर झाला आहे.सदर अपघातात एक तरून बलांबल बचावला आहे.
सोलापूरहुन मालवाहू ट्रक अहमदाबादकडे जात असताना तळेगाव दिघे येथील लोणी-नांदूर शिंगोटे हयवेवरील बाजारतळा नजीक असणाऱ्याअरूंद पुलावर हा अपघात झाला.स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य करत अपघातातील ड्रायव्हर व किल्नर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.या अपघातात मोटरसायकल दाबली गेल्याने मोठे नुकसान यात झाले आहे.वारंवार अपघाताच्या मालिका तळेगाव परीसरात घडत असल्याने पुन्हा एकदा अरुंद पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .सदर पुलाचे रुंदीकरण अथवा दुरुस्तीकरण न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी दिला आहे यावेळी दिला आहे.
