जनतेज न्युज

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लाखो रुपयांचा अम्युबलन्स घोटाळा उघडकीस

प्रतिनिधी , मिरज : ब्रिटिश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ॲम्बुलन्स खरेदीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी ही शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी संघर्ष सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश कुमार कांबळे आणि माहिती अधिकार कार्यक्रते प्रितेन आसर यांनी केली आहे.
मिरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांनी ऍम्ब्युलन्स खरेदी घोटाळा मध्ये घोटाळा करून शासनाची फसवणूक केल्याची बाब माहिती अधिकारातून संघर्ष सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश कुमार कांबळे आणि माहिती अधिकार कार्यक्रते प्रितेन आसर यांनी उघडकीस आणली आहे.मिरजेत पत्रकार परिषद घेऊन महेशकुमार कांबळे आणि प्रितेन आसरा यांनी आरोप केले आहेत. ज्यामध्ये तत्कालीन अधिष्ठाता पल्लवी साफळे यांनी त्यांची आई डॉ.सुप्रिया सफळे यांच्या तर्फे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रक्त पेढीला भेट दिल्याचं जाहीर केलं,त्या बाबत कार्यक्रम घेतला.
प्रत्येक्षात मात्र मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यातून 13 लाख रुपये खर्च करून अम्युबलन्स विकत घेतली आणि हा सर्व प्रकार शासनाची फसवणूक झाल्याच्या तक्रारी वरून या प्रकरणाची चौकशी सुद्धा झाली आहे मात्र, अद्याप कारवाई झाली नाही, त्यामुळे तात्काळ कारवाई झाली नाही,तर अधिवेशनावेळी मुंबई उपोषण करण्याचा इशारा संघर्ष सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश कुमार कांबळे आणि माहिती अधिकार कार्यक्रते प्रितेन आसर यांनी दिला आहे .