प्रतिनिधी , मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ज्या प्रमाणे मुंबई येथे उभारण्यात आले आहे त्याच धर्तीवर धुळ्यात देखील वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण कृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने धुळे महापालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्याकडे करण्यात आली.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाची दखल संपूर्ण महाराष्ट्र राज्य सह देशाने घेतले आहे तसेच बाळासाहेबांचे कार्य संपूर्ण देशाला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. ज्या प्रमाणे मुंबई येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णकृती पुतळा धुळे शहरातील संतोषी माता चौका जवळ असलेल्या मनपाच्या जागेवर उभारण्यात यावा अशी मागणी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, मनोज मोरे, संजय वाल्हे, संजय जवराज यांनी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली.
