जनतेज न्युज

राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास सुरवात

प्रतिनिधी , जालना : मा. सर्वोच्च न्यायाययाने परवानगी दिल्यानंतर आता मंदिर उभारणीसाठीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून निधी उभरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर निधी संकलनासाठी जालना जिल्ह्यात देखील एक समिती गठीत करण्यात आली असुन, १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही समिती जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार कुटुंबांशी संपर्क साधणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष घनशाम गोयल यांनी दिली आहे.
आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की, “श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समिती” या नावाने या समितीची निर्मिती करण्यात आली असुन समितीच्या अध्यक्षपदी उद्योगपती घनश्याम गोयल यांची निवड करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला रा.स्व. संघाचे जिल्हा संघचालक डॉ. नितीन खंडेलवाल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन मुत्याल, यांची उपस्थिती होती.
श्रीराम मंदिराची उभारणी करताना प्रत्येक नागरिकाचे योगदान यात योगदान असावे या उदात्त हेतूने, मकर संक्रांतीपासून पुढील एक महिना घरोघरी जाऊन निधीचे संकलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याला जेवढा शक्य होईल तेवढा निधी त्या व्यक्तीकडून घेतला जाणार असुन, त्याची अधिकृत पावती देखील देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष घनशाम गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.