प्रतिनिधी , पुणे : देशातील मेट्रो सिटीमधील वायु प्रदुषण कमी करण्याकरता आता केंद्र सरकारच्या माध्यमातुन फेम – 2 अंतर्गत150 ई बसेस भा़डे तत्वावर उपलब्ध करुन दिल्या जात असुन पीएपीएमएलला या 150 बसेस एप्रिल अखेर टप्याटप्याने मिळणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रत्येक बसेस मागे 55 लाख इतकी सबसिडी केंद्र सरकार देणार असुन 63.95 प्रति किलोमीटर दराने या बसेस खाजगी कंपनी मार्फत सुरु केल्या जाणार असुन पिंपरी – चिंचवड शहर आणि पुणे शहरात या बसेस धावणार आहेत. तसेच लवकरच शहरातील पेठांधील भागात मध्ये दहा रुपयात दिवसभर फिरत येणार असुन याकरता दोनशे सीएनजी मिडी बसेस दाखल होणार आहेत याकरता पुणे महापालिकेने 25 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. याबाबत गिरीश बापट ,खासदार यांनी माहिती दिली.
