जनतेज न्युज

लातुरात चार मजली इमारतीस आग सोलापूर, उस्मानाबाद, बीड वरून मागवलं अग्निशमन दल

प्रतिनिधी , लातुर : लातूर शहरातील गंज गोलाई भागातील शिवाजी रोड वर गोयल यांचे रंगाचे दुकान आहे …यास संध्याकाळ च्या सुमारास आग लागली काही वेळातच ही आग इमारतीतील चार ही मजल्यावर पसरली …या ठिकाणी रंगाचे साहित्य होते यामुळे आगीने रुद्र रूप घेतले आहे …अग्निशमन दलाच्या जिल्ह्यातील सर्व गाड्या याठिकाणी आल्या आहेत ..उस्मानाबाद आणि सोलापूर येथून ही अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहेत …हा भागा खूप चिंचोळा असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या येथे चारी बाजूने काम करू शकत नाहीत ….मनपा,पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक कर्मचारी या ठिकाणी हजर झाले आहेत …आग लवकर आटोक्यात येईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही