प्रतिनिधी : पुणे , वडगाव शेरी साईनाथ नगर येथे दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी दलित पॅंथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे , जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल केदारी , कार्यक्रमाचे आयोजक पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा विशाल चव्हाण , महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शुभम सोनवणे , पुणे शहर कार्याध्यक्ष बाप्पू वैराट , किरण गायकवाड , राशीद शेख , विकास तौर , मोहसीन शेख , अमोल गायकवाड , विनायक सेन , सागर म्हस्के , पुणे शहर अध्यक्षा आरती बाराथे , चंदा ढोबळे , सविता चीनय्या , सुनीता काळे , राजेंद्र शिंदे , सीता बनसोडे , गँगुबाई रोकडे , जनाबाई रोकडे , जनाबाई माने , सुनीता शिवशरण , सोनल साळवे , शोभा साळवे , सुशीला देवकर , रंजना देवी व गीता साबळे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजक पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा विशाल चव्हाण यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले .
यावेळी दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना सांगितले कि , दलित पॅंथरच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढणारी संघटना असून हा लढा तीव्र करण्यासाठी राज्यात दलित पँथरच्या छावण्या टाकण्यात येणार आहे . त्या माध्यमातून अन्याय व अत्याचार झालेल्या बांधवांचे प्रश्न सोडविण्यात येईल .
