प्रतिनिधी , पंढरपूर : वाढती महागाई, शेतकरी विरोधी कायदे यांच्या विरोधात आज भाजप विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिलीय. या बंदला काँग्रेसने पाठींबा दिलाय. पंढरपूर मध्ये मात्र या बंदला पाठींबा मिळाला नाही . तर काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलीय.
महागाई महागाई चोहीकडे गेले मोदी बायडन कडे अशा घोषणा देत काँग्रेस पदाधिकाऱयांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
