जनतेज न्युज

वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करत ग्रामस्थांचा पनवेल मनपावर मोर्चा

प्रतिनिधी, रायगड : पनवेल महानगरपालिकेने मागील पाच वर्षात कोणत्याही प्रकारची विकासकामे न करता दुपटीपेक्षा अधिक मालमत्ता कराची नोटीस पाठविल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. सेवा नाही तर कर नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी वाढीत मालमत्ता कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पनवेल महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिका अस्तित्वात आल्यावर गावांना ग्रामपंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर आकारले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत अवाच्यासवा मालमत्ता कर आकारल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केलेय. नवी मुंबई ९५ गावे नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला मात्र खारघर पोलिसांनी खारघर मधेच या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेत हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल अशी प्रतिक्रिया नगरसेवक रवींद्र भगत यांनी व्यक्त केलेय.