अंबरनाथच्या वालधुनी नदीवरील पूल धोकादायक
तातडीने पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्यकता
पुलावरून होतेय अवजड वाहनांची वाहतूक
प्रतिनिधी, अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावर वालधुनी नदीवरील पूल सध्या धोकादायक बनलाय. या पुलाच्या खालच्या बाजूने मोठी पडझड झाली असून तातडीनं पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. Vo अंबरनाथ शहराच्या मागच्या बाजूने कल्याण काटई कर्जत राज्य महामार्ग जातो. या महामार्गावर अंबरनाथच्या वेशीवरून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर बांधलेला पूल आहे. हा पूल किमान ५० ते ६० वर्ष जुना आहे. या पुलाची अवस्था सध्या धोकादायक झालीये. पुलाच्या खालच्या बाजूने प्लॅस्टर, सळ्या बाहेर आल्या आहेत. मात्र तरीसुद्धा या पुलावरून दिवसरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत ही शहरं, तसंच आनंदनगर, तळोजा एमआयडीसी यांना हा रस्ता ठाणे आणि नवी मुंबईशी जोडतो. मात्र या रस्त्यावरील महत्त्वाच्या पुलाकडे शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं एखादी
