प्रतिनिधी , सोलापूर : सोलापुरातील बार्शीतील रणजितसिंह डिसले यांनी केलेल्या कामगीरीमुळे त्यांना जागतिक स्तरावरील शिक्षणातील नोबेल समजला जाणारा पुरस्कार मिळाला आणि त्यानिमित्ताने दररोज अनेक नेते त्यांच्या बार्शी येथील निवासस्थानी येऊन भेटी देत आहेत, आज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी डिसले गुरुजींच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनद्वारे संभाषण देखील करवून दिले याप्रसंगी बोलताना त्यांनी विधान परिषदेतील 12 जागांपैकी एका जागेवर राज्यपालांकडे शिफारस देखील करणार असल्याचे सांगितले.
