प्रथिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील वनजमीन त्याचबरोबर महसूल जमीन अतिक्रमण धारक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन उपोषण करत आहेत.आज पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्या घेऊन भूमी मुक्ती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.. यामध्ये जिल्ह्यातील शेकडो महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.येत्या पावसाळी अधिवेशनात शासनाने त्याचबरोबर महसूल व वनविभागाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा येत्या काळात राज्यातील संघटना एकत्रित करून अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण राज्यभर लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी भाई प्रदीप अंभोरे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
