प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी हे संपूर्ण गाव गेल्या 3 दिवसापासून पासून अंधारात आहे. याकडे विज वितरण कंपनीचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने गावातील संतप्त तीन युवकांनी आज मोबाईल टावर वर चढून महावितरणच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन केले केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ढालसावंगी गावात तीन ट्रान्सफर आहे. आणि तिन्ही ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्याने गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. ग्रामस्थांनी वारंवार विज वितरण कंपनीकडे तक्रारी केलीय. मात्र विज वितरण कंपनीला जाग आली नाही. शेवटी आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेत संदीप सानप, गजानन गिरी व सुनील सोनूने यांनी गावातील मोबाईल टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. याची माहिती पोलिसांना मिळतात दहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर या आंदोलनाची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आली आहे..जोपर्यंत नवीन ट्रांसफार्मर येत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. त्यानंतर महावितरण कंपनीने तात्काळ ढालसावंगी गावात नवीन ट्रान्सफॉर्मर पोहोचवले. यानंतर आंदोलन कर्त्यांनीही आपले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
