प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात घाणीचे सामराज्य पसरले आहे.तर अनेक गल्लीमध्ये नाल्या तुंबल्या आहेत त्यामुळे नाल्या भरून रस्त्यावरून घाण पाणी कचरा वाहत आहेत.यामुळे नागरिकांना मोठा मनसताप सहन करावे लागत आहे.त्याचबरोबर नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. तरीही शहरातील नाले सफाई केली जात नाही.कचरा कुंड्या भरले असुन ते रिकामी केले जात नाहीत.अनेक ठिकाणी जसाच्या तसा कचरा पडून आहे.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बट्याबोळ उढाला आहे.स्वच्छतेवर खर्च केले जाणारे लाखो रूपये जातात तरी कुठे असा प्रश्न मुखेड शहर वासियांना पडला आहे.तर मुखेड नगरपालिके कडून रोज च्या रोज साफ सफाई केली जात असल्याचे नगरपरिषदेचे घनकचरा व्यवस्थापन चे उपअभियंता ज्ञानेदव गुट्टे यांनी सांगिते.नगरपालिके कडून साफ सफाई केली जाते तर मग शहरात अस्वच्छता दिसतो कुठून असाही प्रश्न शहरवासियांना पडला आहे.लाखो रूपये स्वच्छतेच्या नावार येतात मात्र ते कागदपत्रिच खर्च करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला तरी मारला जात नसेल ना हा प्रश्न उपस्थित होतो.
