प्रथिनिधी, वर्धा : शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड सेनेच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये तांत्रिक गुंता निर्माण झाल्याने ऑनलाईन प्रशिक्षण रद्द करून ऑफलाईन प्रशिक्षण आयोजित करावे अशी मागणी तक्रार निवारण समितीच्या वतीने म रा शि प ,तक्रार निवारण समिती च्या वतीने अजय भोयर यांचे नेतृत्वात डायट चे प्राचार्य यांचेमार्फत शिक्षण आयुक्त,पुणे व संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद पुणे यांना करण्यात आली व निदर्शने करण्यात आली.शासनाने कोरोना चे कारण पुढे करत ऑनलाइन प्रशिक्षणाचे धोरण नव्याने निर्माण केले. तात्काळ ऑनलाईन प्रशिक्षण रद्द करून पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन प्रशिक्षण आयोजित करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी म रा शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती चे कुंडलिक राठोड, पुंडलिक नागतोडे, रविन्द्र कोठेकर, मंगेश अकर्तॅ, अनंत पोराटे, संजय बारी, मुकेश इंगोले, ज्ञानेश्वर तेलरांधे, दिनेश सेलुकर,दत्तात्रय राऊळकर, प्रशांत सर्याम सह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
