प्रतिनिधी, नांदेड : काल शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे नांदेडमध्ये दाखल झाले होते त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा चांगला समाचार घेतला मी नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकमेव आमदार असून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये मी नगरसेवक देखील आहे मी जनतेचे काम करण्यासाठी तत्पर असल्याकारणाने सर्व जनतेने मला मोठ्या मताधिकारणे निवडून दिले आहे मी जनतेच्या सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहील व जे विकास कामे उर्वरित आहेत त्या कामांना प्राधान्य देण्याचा मी प्रयत्न करेल विरोधकांना ते टोचून म्हणले की त्यांना आई-वडिलांचे संस्कार नसतात ते अरे रवीची भाषा करतात पण मी एक सुजल परिवारा मधला असून माझ्या घरी हरिनामाचा पाठ तसेच आषाढी एकादशीला परिवारातील नागरिक हे मोठ्या प्रमाणात जातात पण विरोधकांना मी सांगू इच्छितो की मी देखील पाटील आहे थोडं सांभाळून विरोधकांचा समाचार घेतला व यापुढे विकासाला गती मिळण्याचे काम सेना भाजपा युती सरकार करणार यासाठी मी प्रयत्न करेन व जनतेला दिलेले शब्द मी पूर्ण करून दाखवेन असे ते यावेळी म्हणाले.
