प्रतिनिधी , धुळे – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कामाच्या प्रेरणा घेऊन शिवसेनेचे धुळे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवत शिवसेनेने ग्रामपंचायती आपले खाते उघडले आहे.
सदर वडदे ग्रामपंचायती मध्ये सिमा देवेसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनिल चित्ते, माधुरी किशोर कोळी, राजेंद्र बन्सिलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रविण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड करुन शिवसेनेचा भगवा फडकवुन गेल्या ४५ वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली.
प्रसंगी शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले व माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, वडदे गावातील पांडुरंग चित्ते, दयाराम चित्ते, ज्ञानेश्वर बागुल, निंबा सौंदाणे, संभाजी चित्ते, संजय चित्ते, महेंद्र सावळे, तुंबा सौंदाणे, योगेश चित्ते, दिलीप चित्ते, रमेश चित्ते सह गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाचे नाव शिंदखेडा तालुक्यात नावलैकिक केले व वडदे येथील गावकऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यात एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना शनाभाऊ सोनवणे यांनी वेक्त केली.
