प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील शेतक-यांच्या वीज कनेक्शन तोडनाऱ्या वीत वितरण कंपनी विरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. इस्लामपुरातील वाळवा पंचायत समितीच्या समोर रस्त्यावर भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केली. या आंदोलनामुळे इस्लामपूर – सांगली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांच्या सहित 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसात जोरदार झटापट झाली. महाविकास आघाडी सरकारसह वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतक-यांच्या वीज तोडणी करणा-या वीज वितरण कंपनीच्या अन्याया विरोधात यापुढील काळात प्रत्येक विभागातील कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे सम्राट महाडिक यांनी सांगितले.
