प्रतिनिधी , जळगाव : पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्या कापसाचे दर सहा हजार रुपयांवर गेले आहेत. मात्र,शेतकयांकडील कापूस संपला अन् त्याचा भाव वाढल्याने शेतकरयांना त्याचा काहीएक फायदा
होणार नाही.यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरयांच्या कपाशीला मार बसला. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही शेतकर्यांचा कपाशीच्या पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. आता ६,२०० रुपये क्विंटलप्रमाणे सुपर कापसाला दर मिळत आहे. त्यामुळे गावोगावी जाऊन व्यापारी कापूस शोधतांना दिसत आहेत.सुरुवातीला कपाशीचा दर पाच हजार रुपये असताना शेतकरयांनी कापूस विक्री केला, तर शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून पाच हजार आठशे रुपयांपर्यंत कापूस खरेदी केला. त्यामुळे काही प्रमाणात शेतकर्यांना कापूस खरेदी केंद्राचा फायदा झाला. मात्र,जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापासून कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली
कारण खासगी व्यापार्यांकडून सहा
हजारांच्यावर कापसाला भाव दिला जात आहे तर दुसरीकडे शेतकरयांकडील कापूस संपत
आला, तशी कापसाच्या दरात वाढ
होत गेली. या कापूस दरवाढीचा
शेतकरयांना काही प्रमाणात फायदा
झाला, तर दरवाढीचा खासगी
व्यापारयांचा मोठ्या प्रमाणात फायदा
होत आहे.
