प्रतिनिधी , पंढरपूर : श्री विट्ठल रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या 9 मुर्त्या बदलण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून त्याची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यास सुरूवात झाली आहे .येत्या 24 तारखेला या 9 मुर्त्या बदलण्यात येणार आहेत यामध्ये मंदिर समितीच्या 28 परिवार देवतांमधील तीन गणपती एक लहान विट्ठल रुक्मिणी ची मूर्ती व खंडोबा व विष्णुपद येथील संगमरवरी विष्णूच्या मूर्तीचा समावेश आहे .
