प्रतिनिधि , नवी मुंबई : महाआघाडी सरकार सत्तेचा गैरवापर करून भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल करत आहे,असे वक्तव्य विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. त्या संदर्भात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोणतेही सरकार असेल ते सत्तेचा दुरुपयोग करतेच, अशी प्रतिक्रिया दिली असून, हा राजकारणाचा पॅटर्न बदलला पाहिजे, लोकांनी यासाठी पुढे आल पाहिजे असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांची सिक्युरिटी काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरेंना कुठल्याही सिक्युरिटीची गरज नाही त्यांच्यासाठी मनसैनिक खंबीर आहेत असेही त्यांनी म्हटले.
