जनतेज न्युज

सांगली जिल्ह्यात आज पासून शाळा सुरू

नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू : नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 750 शाळा : दीड लाख विद्यार्थ्यां पैकी पन्नास हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे :

प्रतिनिधी , सांगली : जिल्ह्यात आज पासून शाळा सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असून नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 750 शाळा आहेत. सांगली जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांपैकी 50 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे शाळांना प्राप्त झाली आहेत. सोशल डिस्टंसिंग, टेंपरेचर चेकिंग, मास्क कंपल्सरी, सनिटेशन या गोष्टी अनिवार्य करण्यात आले आहेत. पहिली दिवशी विध्यार्थी यांचा प्रतिसाद कमी प्रमाणात दिसत आहे. प्रत्येक्ष वर्ग सुरू झाले असले तरी, जे विध्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांच्या साठी ऑन लाईन क्लास सुरू राहणार आहे दरम्यान सांगली जिल्ह्यातील 750 शाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे 6259 जणांची कोरोना चाचणी झाली आहे, त्यातील 22 जण कोरोना पॉझेटिव्ह आहेत.