प्रतिनिधी, सांगली :युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, सांगली जिल्ह्यातील किमान 14 विद्यार्थी अडकले असावेत, प्राथमिक माहिती आहे. सांगली जिल्हा प्रशासनाने दहा विद्यार्थी अडकल्याची माहिती दिली आहे. मात्र, ती संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. व्यवसाय अथवा शिक्षणासाठी जिल्ह्यातील अनेकजण युक्रेनमध्ये गेले आहेत. व्हिडीओ कॉलिंग द्वारे हे विद्यार्थी आपल्या पालकांशी संवाद साधत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्यासाठी मदतीचे प्रयत्न सुरू आहेत.
