जनतेज न्युज

सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातील मतदान केंद्राच्या आवारात पोलिसांच्या कडून लाठीचार्ज

मतदान केंद्रात लोकांची गर्दी झाल्याने, अनावश्यक गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज
प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातील मतदान केंद्राच्या आवारात पोलिसांच्या कडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. शांततेत मतदान सुरू असताना मतदान केंद्रात अचानकपणे लोकांची गर्दी झाली, गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस वारंवार सूचना देत होते, मात्र लोक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अनावश्यक गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. भिलवडी येथील सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या मतदान केंद्रात ही घटना घडली.