प्रतिनिधी, पुणे : सिंहगड किल्लेवर पर्यटकांनासाठी इ बस ची सेवा सुरू करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता, याला प्रतिसाद तितकाच चांगला मिळायला लागला मात्र इ बस सेवा देण्यासाठी सक्षम ठरत नाही . अनेकदा इ बस हे मधेच बंद पडतात ,वळणावर घसरतात , क्षमते पेक्षा जास्त प्रवासी यात प्रवास करत असतात असे अनेक अडचणी सिंहगडवर येणाऱ्या पर्यटकांना सहन करावे लागतात. याचा विरोधात आता मनसे ने केला आहे. मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी 7 दिवसाचा इशारा दिला जर या बसेस मुळे पुन्हा पर्यटक नागिरकाना त्रास झाला तर संबंधीत अधिकाऱ्याला त्या कट्यावररून खाली फेकून देऊन म्हणू ही दुरुस्ती तुमि 7 दिवसात पूर्ण करा अस कनोजिया ने प्रशासनाला इशारा दिला. त्यासोबत जस पहाटेचा शपथविधी अजित दादांचा फसला तशीच ही योजना पण फसली प्रशांत कनोजियाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
