जनतेज न्युज

सिल्लोड येथील निवासी मतिमंद विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला आहे.

प्रतिनिधी , औरंगाबाद : सिल्लोड येथिल शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड, बाळकृष्ण मुकबधीर विद्यालय सिल्लोड,व अपंग निवासी विद्यालय शाळेच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींचा व दिव्यांग कर्मचारी यांचा सत्कार करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक कृष्णा लहाने हे होते तर सेवा निवृत्त नामदेव राव चापे , हभप कमलाकर महाराज पिंगळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्ञानोबा दळवी, श्री सरोदे व नामदेव राव चापे यांनी आपले विचार मांडले. Byte…..
यावेळी मुख्याध्यापक शामकुमार सोनवणे , संगिता पाटील यांच्या सह निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड , बाळकृष्ण मुकबधीर निवासी विद्यालय सिल्लोड, अपंग निवासी विद्यालय सिल्लोड चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.