जनतेज न्युज

सुस्थितीतील बसेस रस्त्यावर उतरवा – कल्याण वाहतुक पोलिसांच केडीएमटी ,एनएमटी,एसटी महामंडळाला आवाहन

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण शहरात पत्रिपुल ,कोपर पूल,वाळधुनी पुल,दुर्गाडी पुलाची कामे सुरू आहेत त्यातच कल्याण शीळ रोड रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहेत .अवघ्या काही मिनिटांच्या अंतरांसाठी तासाभराचा कालावधी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत .त्यात भरीस भर म्हणजे अनेकदा केडीएमटी ,एन एमटी , एसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा भर रस्त्यात मान टाकत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते .अनेकदा केडीएमटी ,एन एमटी , एसटी महामंडळाकडून नादुरुस्त बसेस या मार्गावर धाडल्या जातात त्यामुळे बसेस भर रस्त्यात बंद पडल्यास वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात .याबाबत वाहतुक पोलिसांकडून केडीएमटी ,एनएमटीसह एसटी महामंडळाला पत्र धाडण्यात आले असून या पत्राद्वारे
ना दुरुस्त बसगाड्या रस्त्यावर चालवू नये,सुस्थितीत असलेल्या बसेस रस्त्यावर मार्गी लावाव्यात असे आवाहन केलं आहे तसेच एसटी महामंडळाला कल्याण डोंबिवली शहरात सूचित केलेल्या मार्गवरून एसटी गाड्याचे मार्ग निश्चित करावे जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही असं आवाहन केलं आहे