जनतेज न्युज

चोपड़ा उपजिल्हारूग्णालयात कोवीड 19 आजारावरील लसीकरणाला सुरुवात डॉ.मनोज पाटील यांनी घेतली पहिली लस.

प्रतिनिधी , चोपड़ा : कोवीड 19 आजारावरील लसीकरणाला आज सर्वत्र दिली जा असल्याने आज चोपडा उपजिल्हारूग्णालयात आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी फित कापून लसीकरणाचे उद् घाटन केले यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,उपजिल्हारूग्णालय अधिक्षक डॉ.मनोज पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर,माजी प स उपसभापती एम व्ही पाटील, तहसीलदार छगन वाघ,पोलीस निरीक्षक आवतारसिंग चव्हाण ,रूग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.
आज चोपडा उपजिल्हारूग्णालय येथे कोवीड 19 ची पहिली लस घेत आहे या लसीवर तिघ ट्रायल सक्सेफुल झालेल्या आहेत तरी सर्व लाभार्थ्यांनी न घाबरता कुठल्याही गोष्टींचा विचार न करता ही लस अतिशय सुरक्षित आहे बिनधास्त घ्यावी असे मी आवाहन करतो उपजिल्हारूग्णालय अधिक्षक डॉ.मनोज पाटील.
कोवीड 19 ची लसीकरणाला कोवीड योध्दा यांच्या पासून सुरवात करण्यात आले.कोवीड काळात मेडिकल कर्मचारी,पोलीस,महसूल,शिक्षक कर्मचारी यांनी जिवाची परवा नकरता काम केलं त्यांच अभिनंदन करतो आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब यांनी संपूर्ण देशात लसीचे लोकार्पण केले आहे चोपड्यात डॉक्टर मनोज पाटील यांनी कोवीडची लस घेतलेली आहे कोवीड लस घेतलांना मनामध्ये कोणतीही भिती न ठेवता आपण घ्यावी अशी विनंती आपल्याला करतो.लस घेतल्यानंतर आपण बिनधास्त न होता मास वापरले पाहिजेत स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी केले.
व्हाँक्सीलेटर शिला पोटोगाड यांनी सांगितले की कोवीड 19 ची लस देणार आहेत त्यांना तिस मिनिटं निरिक्षण रूम मध्ये थांबायचं आहे घरी घेल्यानंतर जर त्रास झाला तर सरकारी दवाखान्यात सांगायचे आहे लस दिल्यानंतरही हात धुणे मास वापरणे चांगले सवयी सुरळीत ठेवायचे आहे.