जनतेज न्युज

हर घर तिरंगा मोहीम नसून भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण – आ. अमोल मिटकरी

प्रतिनिधी, अकोला :  हर घर तिरंगा ही मोहीम सध्या सुरु असून शासनाकडुन विक्रीस असलेल्या तिरंग्याची किम्मत 30 रुपये आहे तर प्रायव्हेट संस्थेकडुन विक्रीस असलेल्या तिरंग्याची किम्मत ही 25 रुपये असून तिरंग्याच्या कॉलिटी मध्ये ही फरक आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या राज्यात एकीकडे देश आर्थिक संकटात सापडला आहे. तर शिंदे सरकारच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला असून या कडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहीम राबवत असून भारताच्या ध्वजाचे व्यावसायिकरण करीत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.