जनतेज न्युज

हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पनवेल रेल्वे पोलिसांनी 24 तासात केली अटक.

प्रतिनिधी , नवी मुंबई : आपल्या मित्राला मोबाईल देण्यासाठी निघालेल्या तक्रारदार तरुण मोहम्मद आरिफ शेखने जीटीबी रेल्वे स्थानकातून पहाटेची लोकल पकडली. सदर लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात आल्यानंतर मोहम्मद बसलेल्या मालडब्यात २० ते २२ वयोगटातील पाच तरुण चढले. लोकल सीवूड्स रेल्वे स्थानकात आल्यानंतर या पाच जणांनी मोहम्मदला धमकावून त्याच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. मोहम्मदने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या टोळीतील आरोपीनी त्याला बेदम मारहाण करत त्याच्या खिशातील ३५० रुपये, त्याचे एटीएम कार्ड आणि कामाचे ओळखपत्र काढून घेतले. यानंतर पाचही तरुणांनी बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून पलायन केले. तर मोहम्मदनेदेखील बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून तेथील टीसीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. टीसीने रेल्वे पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील पाच तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना २४ तासात अटक देखील केले आहे.