प्रतिनिधी, जळगाव : वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे पीक विमा बाबत पंचनामे केले जात आहेत. परंतु शेतकऱ्यांना एकही पैसा मिळालेला नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले सरकार आहे. अशी भारतीय जनता पार्टीचे जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी सरकारवर टीका केली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत अनेक वादळे व मोठा अनेक वेळा पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिक विमा कंपन्या याबाबत कोणतीही हालचाल करत नाही. तर सरकार पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहे. खरे तर सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे होते. सरकार मात्र कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहत नाही. या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया जळगाव शहरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश भोळे यांनी माध्यमांशी बोलताना जळगाव येथे दिले आहे.
