जनतेज न्युज

११वी मधील स्वप्नाली स्वतः काढत होती ट्रक्टर चाकाचे पॅंक्चर , सैन्यात भरती व्हायचे होते.

११वी मधील स्वप्नाली स्वतः काढत होती ट्रक्टर चाकाचे पॅंक्चर , सैन्यात भरती व्हायचे होते पण छेडछाडीला कंटाळून आत्महत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केली टाळाटाळ

प्रतिनिधी , पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील सत्यवान प्रभू गाजरे हे मोटारसायकल पंक्चर काढून उदरनिर्वाह करतात. एक मुलगी विवाहित आहे तर दुसरी मुलगी स्वप्नाली हि वाडीकुरोली येथील महाविद्यलयात ११ वीचे शिक्षण घेत होती.व शिक्षणासाठी रोज येजा करत होती.मात्र लॉकडाऊनच्या काळात घरीच राहून ती ऑनलाईन अभ्यास करत होती.मात्र गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला ती पुरती कंटाळली होती आणि या छळास कंटाळूनच स्वप्नाली सत्यवान गाजरे (वय १७ ) अल्पवयीन मुलीने ६ डिसेंबरच्या मध्यरात्री आत्महत्या केली असून या घटनेमुळे शेळवे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
तर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय . सत्यवान प्रभु गाजरे वय-43 व्यवसाय- पंम्चर दुकान रा.शेळवे ता.पंढरपुर मयत मुलगी स्वप्नाली ही इयत्ता 11वी मध्ये केबीपी काँलेज येथे शिकत होती. ती दररोज मोटार सायकलवरून येऊन जाऊन करत होती. शुभांगी ही इयत्ता 12वी मध्ये वाङीकुरोली येथे काँलेजला जात होती .सध्या लाँक ङाऊन काऴात आँनलाईन शिक्षण घरीच घेत होती . राहत्या घरी ती अभ्यास करीत असलेल्या खोलीमध्ये कोणत्यातरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गऴफास घेऊन आत्महत्या केली होती.दि 09/12/2020 रोजी साधारण सायंकाळी 05/00 वा. सुमारास मी मयत स्वप्नाली हिचे शाळेची सँक तपासले असता त्यात दोन कयरची वही असुन त्यामध्ये लाल पेनाने अर्धे पानाची चिठ्ठी मिळुन आली त्यावर तिने पुढील प्रमाणे मजकुर लिहलेला आहे. किती सहन करु मी मला आता अजिबात सहन होत नाही तिरंगा आणी आर्मीचा गणवेश माझ्या नशीबात नाही कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेन हात धरुन केलेली छेडछाड आणी कुणाला सांगु नको म्हणुन दिलेली जीव मारणार ही धमकी मला सहन होत नाही लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवुन दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा नाही तसल्या पोरांना घेवुन नाचायचा सगळी स्वप्नील स्वप्नाली म्हणुन नववी पसनच चिडवायची. जाता – येता त्यांच्या नजरेचा मला लय त्रास व्हायचा आजपर्यंत सहन केल पण आता सहन होत नाही म्हणुन मी आज माझ जीवन संपवतेय . हे भारत माते मला माफ कर , आई बापु मला माफ करा आत्महत्या करण गुन्हा आहे तरीसुध्द मी करतेय तुमची स्वप्नाली असे चिट्टीत मजकुर आहे.