जनतेज न्युज

आज माघ शुद्ध जया एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलीय.

प्रतिनिधी , पंढरपूर : आज माघ शुद्ध जया एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलीय. तसेच मंदिरावर देखील मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीय.
मंदीरात सजावटीसाठी झेंडू , शेवंती , ग्लॉडियो, ऑरकेड, ब्लु डी जे ,सॉंगोप ड्रेसिंना आदी एक टन फुलांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आलीय.
देवाच्या गाभाऱ्यात गरुडाची प्रतिकृती साकारली असून श्री विठ्ठल साक्षात गरुडावर स्वार झाल्याचा भास होताहे. तसेच रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात कलश-श्रीफळ
साकारण्यात आले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे रुप अधिकच खुलले आहे.
आजची फुलांची सजावट पुण्याचे भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार या भाविकांनी केलीय.
तर विद्युत रोषणाई कोल्हापूरच्या शिरोळचे भाविक पुंडलिक महात्मे यांनी केलीय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर बंद असल्याने भाविकांना देवाचे थेट दर्शन घेता येत नाही मात्र आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण देवाचे दर्शन घेऊ शकता .